दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज सामाजिक अभ्यासक प्रा. एस. व्ही. मोहिते यांनी व्यक्त केली. स्थलांतर , बालविवाह आणि कमी वयात होणारी प्रसूती ही साखळी एकमेकांशी जोडलेली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत या घटकांचा परिणाम अधिक प्रकर्षाने जाणवू शकतो, असे त्यांनी सांगितले.