पुणे : विद्यांचल स्कूल , ऑर्बिस स्कूल या संघांनी शिक्षण विभाग ( पुणे मनपा ) आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे आयोजित चौदा वर्षांखालील मुलींच्या शालेय बास्केटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
डेक्कन जिमखाना क्लब येथे ही स्पर्धा सुरू आहे. रोशनी मंडल (१० गुण) आणि शुभ्रा शिंदे (४) यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर बाणेरच्या विद्यांचल स्कूलने खराडीच्या कोठारी इंटरनॅशनल स्कूलवर १७-६ अशी मात केली.दुसऱ्या लढतीत आरोही जाधव (९), मिती लोया (५) यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर मुंढव्याच्या ऑर्बिस स्कूलने अमनोरा स्कूलवर २१-१९ अशी मात केली. अमनोरा संघाकडून हर्षिका पवारने (१४) एकाकी झुंज दिली.
याशिवाय सरदार दस्तूर स्कूलने सेंटर अरनॉल्ड्स स्कूलवर ३९-७ असा विजय मिळवला.