तरुणाला शस्त्रासह अटक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
arrest of youth with weapon terrifying ruckus in nagpur
नागपूर : हातात चाकू घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालणाऱ्या तरुणाने पोलिसांशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी कळमणा पोलिसांनी देवांशु उर्फ मोनू अनिल यादव (२३, रा. आदिवासी प्रकाशनगर, कळमना) याला अटक केली. मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी रात्री कळमणा पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना कुंजारवाडी, डेप्युटी सिग्नल परिसरातील सिमेंट रस्त्यावर यादव हातात शस्त्र घेऊन धुमाकूळ घालताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून लोखंडी चाकू जप्त करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली.