भारतीय हवाईदलाचा वर्धापनदिन उत्साहात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
भारतीय हवाईदलाचा वर्धापनदिन उत्साहात
नागपूर : भारतीय हवाई दलाच्या ९४व्या वर्धापनदिनानिमित्त वायुसेनाननगर येथील मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी ‘हॉलो स्क्वेअर परेडने सोहळ्याचा समारोप झाला.यावेळी एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल यल्ला उमेश यांनी सर्व जवानांना देशसेवेची शपथ दिली. या सोहळ्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि एअर स्टाफ प्रमुखांचे संदेश वाचून दाखवण्यात आले. उत्कृष्ट सेवेबद्दल गुणवंत कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रके देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी एअर मार्शल यांनी यल्ला उमेश यांनी शौर्य स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून अमर जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच माजी सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.