‘तुकडोजींच्या पुतळ्याचे नामफलक दुरुस्त करा’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
demand to repair the nameplates of sant tukdoji maharajs statue
नागपूर : मानेवाडा रोडवरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ऐतिहासिक पुतळ्याच्या परिसरातील जीर्ण व तुटलेले दानदात्यांचे कोरीव दगडी नामफलक तत्काळ दुरुस्त करून पूर्ववत लावण्यात यावेत, अशी मागणी श्रीगुरुदेव युवा मंचाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी नागपूर महानगरपालिकेकडे केली आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रसंतांचा स्मृतिदिन असून त्यापूर्वी ही दुरुस्ती पूर्ण करावी, असेदेखील त्यांनी म्हटले आहे. तुकडोजी कॅन्सर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना वेदना सहन करण्याची मानसिक ताकद मिळावी या भावनेतून हरिभाऊ नाईक, रतनचंद डागा, दुर्गादास रक्षक आणि स्मारक समितीच्या सदस्यांनी या पुतळ्याची निर्मिती केली. काळाच्या ओघात हे दगडी नामफलक जीर्ण व तुटलेल्या अवस्थेत आहे.