(पान एकवरून)होते. बस टेम्पोच्या बाजूने जात असताना, फरीद शेख यांनी अचानक टेम्पोचा मागचा दरवाजा उघडला. तो दरवाजा बसच्या पाठीमागील डाव्या कोपऱ्याला धडकला आणि उसळून फरीद यांना लागला. यामुळे फरीद खाली पडले आणि जखमी झाले. बेस्ट प्रवाशांनी यासंदर्भात चालकाला माहिती दिल्यानंतर चालकाने पुढे जाऊन बस थांबवली. त्यानंतर उपस्थित स्थानिकांनी बेस्ट चालकाला जाबही विचारला.
त्यानंतर चालकाने स्वत:हून १०० क्रमांकावर फोन करून याची माहिती पोलिसांना दिली.
या घटनेत जखमी झालेल्या फरीद शेख यांना जोगेश्वरीतील एचबीटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बेस्ट बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.