मोदी-नेतान्याहू यांच्यात दूरध्वनी संवाद

Contributed by: नवी दिल्ली,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
modi netanyahu discuss peace in west asia
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात गुरुवारी दूरध्वनीवरून चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली आणि या प्रदेशात शांतता व स्थैर्य पुनर्स्थापित करण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला.

नेतान्याहू यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संवादाची पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर माहिती दिली. इस्रायलच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून विविध विषयांवर चर्चा झाल्याचे मोदी यांनी त्यात नमूद केले. उभय नेत्यांनी भारत-इस्रायल संबंधांमधील सातत्यपूर्ण गतीचे स्वागत केले.
‘नेत्यांनी पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींवरही विचारांची देवाणघेवाण केली आणि या प्रदेशात शांतता व स्थैर्य पुनर्स्थापित करण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला. पंतप्रधान मोदी यांनी वाद आणि मुत्सद्देगिरीसाठीच्या भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. ‘आम्ही पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींवरही चर्चा केली आणि या प्रदेशात शांतता व स्थैर्य पुनर्स्थापित करण्याचा गरजेवर भर दिला,’ असे मोदी म्हणाले.