Indian Killed In Saudi Attack India Strongly Condemns The Attacks
सौदीतील हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
(पान एकवरून)
केले. याच विमानतळाला यापूर्वी ११ ऑक्टोबरलाही लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात आठ जण जखमी झाले असून त्यात दोन भारतीयांचा समावेश आहे. जखमींमध्ये बांगलादेशी आणि नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे.(पान एकवरून) केले. याच विमानतळाला यापूर्वी ११ ऑक्टोबरलाही लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात आठ जण जखमी झाले असून त्यात दोन भारतीयांचा समावेश आहे. जखमींमध्ये बांगलादेशी आणि नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे.
दरम्यान, याच दिवशी शैबा तेलक्षेत्राला लक्ष्य करणाऱ्या ड्रोन हल्ल्यात एका भारतीय नागरिकासह दोन जण जखमी झाले. या जखमी नागरिकाला आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, असे भारतीय दूतावासाने सांगितले. तर, हवाई संरक्षण यंत्रणांनी ड्रोन हल्ला परतवून लावला. मात्र, ड्रोनचे तुकडे खाली पडल्याने दोन रहिवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक फिलिपिनो आणि एक नेपाळी नागरिक होता. या घटनेत भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक जखमी झाले.
हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध
नवी दिल्ली : सौदी अरेबियातील नागरी आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर झालेल्या ताज्या हल्ल्यांचा भारताने गुरुवारी तीव्र निषेध केला. या हल्ल्यांत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून तीन भारतीय जखमी झाले आहेत. ‘नागरी आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करणारे हल्ले पूर्णपणे अस्वीकार्य असून ते तातडीने थांबले पाहिजेत’, असे भारताने स्पष्ट केले.
सात जहाजांना आग
तेल अविव : हल्ला किंवा पाण्याखालील सुरुंगांमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत सात जहाजांना आग लागली असून त्यामुळे पुन्हा एकदा सर्वंकष युद्धाला तोंड फुटू शकते, असा इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे.