खालिदा झिया काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्र टाइम्स

बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि बीएनपीच्या अध्यक्षा खालिदा झिया यांचे निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी बांगलादेशच्या राजकारणात आपले स्थान टिकवून ठेवले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

खालिदा झिया काळाच्या पडद्याआड

बांगलादेशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) अध्यक्षा खालिदा झिया (८०) यांचे मंगळवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या चार दशकांहून अधिक काळ झिया यांनी बांगलादेशाच्या राजकारणात अढळपद प्राप्त केले होते. त्यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या निधनाने देशावर शोककळा पसरली असून हंगामी सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

झिया यांच्या पार्थिवावर आज, बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. खालिदा झिया यांना २३ नोव्हेंबर रोजी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ढाक्यातील एव्हरकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्यांच्या छातीत संसर्ग असल्याचे आढळल्यानंतर झिया यांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली

(पान १०वर)