आठवीतील मुलाची मित्रांकडून हत्या

महाराष्ट्र टाइम्स

A shocking incident unfolded in Bhandup where an eighth-grade student, Siddharth Londhe, aged 14, was murdered by his friends. The crime came to light after his body was found near Vihar Lake. A post-mortem examination revealed severe head injuries, leading to the arrest of three minors. The accused confessed to killing Siddharth and dumping his body in the lake.

आठवीतील मुलाची मित्रांकडून हत्या
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

इयत्ता आठवीतील मुलाची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याची घटना भांडुपमध्ये उघडकीस आली आहे. सिद्धार्थ लोंढे (वय १४) असे या मृताचे नाव असून, या प्रकरणी तीन विधिसंघर्षग्रस्त मुलांना अटक करण्यात आली. शवविच्छेदन अहवालामुळे हत्येचे बिंग फुटले.

भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुलशेत पाडा परिसरात सिद्धार्थ वास्तव्यास होता. २२ फेब्रुवारीला दुपारी तीनच्या सुमारास तो खेळायला जातो, असे सांगून घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत सिद्धार्थ घरी न आल्याने पालकांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास आणि शोध सुरू असतानाच मुलुंड पोलिसांच्या हद्दीमध्ये विहार तलावाजवळ २३ फेब्रुवारीला सिद्धार्थचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन अहवालात सिद्धार्थच्या डोक्याच्या मागील बाजूस दुखापत आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्याचेही अहवालात नमूद होते. यावरून पोलिसांनी नव्याने तपास सुरू केला. तीन मित्रांनी सिद्धार्थला मारून तलावात टाकल्याचे चौकशीत मान्य केले.