इंग्रजी विषयाच्याउत्तरपत्रिका दडविल्या

महाराष्ट्र टाइम्स

An incident at an examination center in Anjangaon Surji has come to light. Two answer sheets from the 10th-grade English exam were discovered hidden. This led to a case being filed against five people, including invigilators. Two individuals have been arrested, while one remains at large. The discovery was made during a surprise inspection by a flying squad.

class 10 scandal employee found hiding english urdu answer sheets in shirt at exam center two arrested

अंजनगाव सुर्जी येथील एका परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या दोन उत्तरपत्रिका कस्टडीत जमा न करता दडवून ठेवल्याची घटना भरारी पथकाच्या तपासणीत समोर आली. या प्रकरणी परीरक्षक सुधीर खोडे, सहपरीरक्षक सुशीलकुमार अभ्यंकर, अनिल हाडोळेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील खोडे व हडोळे या दोघांना अटक करण्यात आली. अभ्यंकर फरारी आहे.

भरारी पथकाने २७ फेब्रुवारीला सायंकाळी सुमारे ४.४० वाजता परीक्षा केंद्रावर दाखल झाले. त्यावेळी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू होता. पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिका मोजून सील करण्यास विलंब होत होता. अनिल हाडोळे नामक कर्मचारी संशयास्पद हालचाली करताना आढळला. तपासणीत त्याच्या शर्टमध्ये दडवून ठेवलेल्या दोन उत्तरपत्रिका सापडल्या. त्यापैकी एक इंग्रजी माध्यमाची, तर दुसरी उर्दू माध्यमाची असल्याचे समोर आले.