पोलिसांना मिळणार सुट्टी न घेण्याचे ‘फळ’

महाराष्ट्र टाइम्स

Police personnel who forgo their leave will soon receive financial compensation. The Maharashtra Police Headquarters is preparing a proposal to increase the leave encashment limit from 300 to 600 days. This move aims to prevent financial losses for honest officers who prioritize duty over personal leave. The proposal will be sent to the government for approval.

the fruit of not taking leave by police proposal to cap leave balance at 600

(पान एकवरून)

मनुष्यबळ नसल्याने पोलिसांना या सुट्ट्या घेता येत नाहीत. ३० ते ४० वर्षे पोलिस दलामध्ये सेवा बजावल्यानंतर तीनशेपेक्षा अधिक सुट्ट्या शिल्लक असल्यास त्या वाया जातात. तीनशे सुट्ट्यांचे पैसेच पोलिसांना मिळतात. यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शिल्लक रजांची मर्यादा सहाशे करण्याचा विचार आहे. यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत असून तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

महासंचालक कार्यालयाकडून तयार करण्यात येणाऱ्या या प्रस्तावासाठी आवश्यक असलेली माहिती मुंबईसह राज्यातील इतर पोलिसांकडून मागविण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात निवृत्त झालेल्या पोलिसांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. वर्षभरात निवृत्त झालेल्या पोलिसांपैकी किती पोलिसांनी तीनशेची मर्यादा ओलांडली होती, तसेच इतर तपशील मागविण्यात आला आहे. राज्यभरातून मिळालेल्या तपशिलांच्या आधारे प्रस्ताव तयार करून शासनदरबारी पाठविण्यात येणार आहे. कर्तव्याला प्राधान्य देत सुट्ट्या न घेणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांचे यामुळे आर्थिक नुकसान टळणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.