राज्याचा समृद्ध संगीत वारसा आणि दिवाळीच्या आनंदाचा एकत्रित उत्सव असलेला ‘दिवाळी पहाट’ सोहळा सोमवार, २० ऑक्टोबरला प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. पद्मश्री सुरेश वाडकर, प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि इतर नामवंत कलावंत यात सादरीकरण करणार आहेत.
नरक चतुर्दशीला स. ६ वाजता ही ‘दिवाळी पहाट’ रंगणार आहे. सुगी ग्रुपतर्फे आयोजित या कार्यक्रमात पारंपरिक, शास्त्रीय आणि लोकसंगीत यांचा सुरेख मिलाप अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात आमंत्रण पत्रिकेद्वारेच प्रवेश दिला जाणार असून, रवींद्र नाट्यमंदिर-प्रभादेवी, शिवाजी मंदिर-दादर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक-दादर, शिवाजी पार्क जिमखाना-दादर, दीनानाथ नाट्यगृह-विलेपार्ले आणि सुगी ग्रुप कार्यालय-वरळी याठिकाणी यासाठीच्या मोफत प्रवेशिका उपलब्ध असतील, असे आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे.





