इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुनावळे येथील 'द फोर ॲक्सेस' या नवीन इमारतीत काम करणाऱ्या २० वर्षीय महंमद सरफराज याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी दुपारी तो एकटाच काम करत असताना ही घटना घडली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

tragic death of worker after falling from building in punawale

सांगवी : महंमद सरफराज (वय २०, रा. सध्या लेबर कॅम्प, पुनावळे, मूळ रा. गारा, सीतामढी, बिहार) याचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. पुनावळे येथील काटे वस्ती येथे ‘द फोर ॲक्सेस’ या नवीनच काम सुरू असलेल्या इमारतीत तो इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होता.

दुर्घटनेवेळी महंमद शनिवार दुपारी एकटाच काम करीत असताना ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शवविच्छेदन अहवाल बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.