‘ फायबर टू सिल्क फॅब एक्स्पो’मध्ये ड्रेस मटेरियलची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. इथं केवळ उत्सवासाठी नव्हे, तर लग्नाच्या हंगामासाठीही ड्रेस मटेरियल उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील खरं जरी वर्क असलेली पैठणी, मध्य प्रदेशातील माहेश्वरी, चंदेरी; बेंगळुरू आणि म्हैसूर सिल्क क्रेपसह नवी खरेदी करू शकता. याशिवाय इथं राजस्थानमधील ब्लॉक आणि सांगानेरी प्रिंटसह गुजरातमधील गठजोडा, बांधणी यांत भरपूर पर्याय मिळतील. बनारसी सिल्क, कंठा-स्टिच, बालुचेरी, टांगाईल, जामदानी-पटोला आणि वाराणसीतील शिफॉनसह दक्षिण भारतीय सिल्क साड्यांची विस्तृत श्रेणी मिळेल.
इथली किंमत वाजवी व परवडणारी आहे. एक्स्पोमध्ये वेगवेगळ्या डिझाइन आणि नमुन्यांमध्ये साड्या, दुपट्टा आणि सलवार सूट मटेरियल आहेत. जयपूर कुर्ती, राजस्थानमधील कोटा डोरिया, उत्तर प्रदेशातील तंचोई, बनारसी जामदाणी, जमावर, लखनवी चिकन अशी विविधता इथं दिसते. खास पार्टीवेअर कपडेही आहेत.
स्थळ : सोनल हॉल, गरवारे कॉलेजजवळ,
कर्वे रस्ता, पुणे
दिनांक : १४ एप्रिल २०२६ पर्यंत
वेळ : सकाळी ११ ते रात्री ९




