रिलायन्सचे अधिकारी, अनिल अंबानी आरोपी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीवर फसवणुकीचा आरोप आहे. जीवन विमा महामंडळाने केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे ३,७५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अनिल अंबानी आणि कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.

cbi actions against anil ambani and reliance officials

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) बुधवारी आणखी एक गुन्हा दाखल केला.

जीवन विमा महामंडळाच्या (एलआयसी) वतीने करण्यात आलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, खोट्या कागदपत्रांच्या आधारे रिलायन्सने गुंतवणूक करण्यास भाग पाडून ३,७५० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिलायन्सचे अनिल अंबानी आणि इतर अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करण्यात आले आहे.