खरात याची पत्नी कल्पना हिच्यावरदेखील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून ती पसार झाली आहे. त्यामुळे तिच्याबाबत पोलिसांनी ‘लूकआउट’ नोटीस जारी केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी घरी जाऊन तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याआधीच तिने पोबारा केला. ती देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तिला ‘लूकआउट’ नोटीस जारी केली. विमानतळ, बंदरे; तसेच इतर प्रवेश-निर्गम ठिकाणी संबंधित यंत्रणांना दक्ष करण्यात आले आहे.
धार्मिक विधीच्या नावाखाली मंतरलेले पाणी पाजून महिलेवर वेळोवेळी बलात्कार करून तिचा गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी संशयित भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
त्यामुळे बुधवारी नाशिकरोड कारागृहात रवानगी झालेल्या खरातचा दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलिस कोठडीत ‘पाहुणचार’ होणार आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात गुरुवारी (दि. २) सुनावणी झाली. अघोरी कृत्यांच्या माध्यमातून पीडितेचा छळ करणाऱ्या खरातला आठ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२६ या काळात खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिसांत दाखल आहे. खरातने तिला भविष्याबद्दल भीती दाखवून वेळोवेळी कार्यालयात बोलावून घेतले. तेथे तांब्याच्या बाटलीतील ‘मंतरलेले पाणी’ पाजून वारंवार बलात्कार केल्याने पीडिता गर्भवती राहिली. तिला जबरदस्तीने गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. पीडितेने खरात याच्या कृत्यांना विरोध केला तेव्हा त्याने तिला ‘तुझ्या मुलांचे बरे-वाईट होईल. तुझे वाटोळे होईल,’ अशी भीती घालून गप्प केले.