नवी दिल्ली : जागतिक बँकेने गुरुवारी सांगितले की, भारत सध्याच्या जागतिक संकटाशी मुकाबला करण्यास समर्थ आहे. उच्च परकीय चलन साठा आणि कमी महागाई अशा गोष्टींमुळे जागतिक आव्हाने असूनही भारताच्या आर्थिक विकासाला बळ मिळेल. चालू आर्थिक वर्षासाठी जागतिक बँकेने जीडीपीचा वृद्धिदर ६.६ टक्के राहील असे म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.६ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर जागतिक बँकेने सांगितले की, भारताने गेल्या आर्थिक वर्षात व्यापारातील चढ-उतारांचा चांगल्या प्रकारे सामना केला आहे. तेल बाजारात अस्थिरता निर्माण करणाऱ्या मध्य पूर्वेतील सध्याच्या संकटातही भारतीय अर्थव्यवस्था चांगली वाटचाल करत आहे. भारताचा विकासदर आर्थिक वर्ष २४-२५ मधील ७.१ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २५-२६ मध्ये ७.६ टक्क्यांपर्यंत वाढला

