बेकायदा कृत्यांचे केंद्र

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लोकमान्य बस डेपो परिसरात बेकायदा कृत्ये सुरू आहेत. चायनीज सेंटरमधून मद्यपान आणि अमली पदार्थांची विक्री होत आहे. यामुळे तरुण नशेच्या आहारी जात आहेत. परिसरात हाणामारीच्या घटना वाढत आहेत. स्थानिक नागरिक चायनीज सेंटर बंद करण्याची मागणी करत आहेत. महापालिका आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा आहे.

illegal alcohol and drug sales at chinese center locals demand action

लोकमान्य बस डेपोच्या आसपास गाळ्यांमध्ये चायनीज सेंटरच्या माध्यमातून अनेक बेकायदा कृत्ये सुरू असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांकडून सातत्याने केला जात आहे. चायनीज सेंटर च्या जागेमध्ये बेकायदा मद्यपान आणि अमली पदार्थांची विक्री होत असल्याने तरुण नशेच्या आहारी जात आहेत. त्यामुळे या भागात सातत्याने हाणामारीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे चायनीज सेंटर बंद करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. पदपथावर अतिक्रमण, अग्निसुरक्षेला बगल देऊन या भागात सुरू असलेले व्यवसाय बंद करण्यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने धडक कारवाई करण्याची मागणी यानिमित्ताने स्थानिकांकडून केली जात आहे.