मुंबई : पश्चिम आशियातील परिस्थिती नाजूक असल्याने गुरुवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ९ पैशांनी घसरून ९२.६३वर बंद झाला. आंतरबँक परकीय चलन बाजारपेठेत, रुपया डॉलरच्या तुलनेत ९२.६३ वर उघडला. व्यवहारादरम्यान त्याने ९२.९२ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. दिवसाच्या उच्चांकी स्तरात रुपया ९२.५३ पर्यंत पोहोचला होता. गुरुवारी व्यापारी सत्राच्या शेवटी, रुपया त्याच्या मागील बंद भावाच्या तुलनेत ९ पैशांच्या घसरणीसह ९२.६३ वर स्थिरावला.

