ई-केवायसीसाठी मुदतवाढ

महाराष्ट्र टाइम्स

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला होता. त्यामुळे ही सुधारणा करण्याची संधी दिली जात आहे. यानंतर मात्र कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही.

extension for e kyc

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसीमधील दुरुस्तीसाठी महिला व बालविकास विभागाने मुदतवाढ देण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. या निर्णयानुसार या लाभार्थ्यांना यात सुधारणा करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. मात्र, यानंतर कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी मिळणार नाही, असे या वेळी जाहीर करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५पर्यंत ई-केवायसी करण्याची सूचना सरकारने केली होती. ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण करताना अनेक पात्र लाभार्थ्यांनी कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला होता. त्यामुळे यात बदल करण्याची संधी द्यावी, अशी मागणी राज्यभरातून केली जात होती.