तथागत भगवान गौतम बुद्ध मेडिटेशन फाउंडेशन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने ‘बोधीवृक्ष माझ्या दारी’, माझा प्राणवायू, माझी जबाबदारी, राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण व संवर्धन महाकृती अभियानांतर्गत क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पर्यावरणपूरक साजरी केली जाणार आहे. १३५ बोधीवृक्ष वाटप व लागवड करुन उत्सव साजरा केला जाईल.
भंते करुणानंद महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश भोसले यांनी हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची यासाठी उपस्थिती असेल. विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात पर्यावरणाचे महत्त्व सांगून त्यांना पर्यावरण, वृक्षारोपणाविषयी आवड व गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने शाळा, महाविद्यालय, विहारे, मंदिरे, रुग्णालये, क्रीडा संकुले, मैदाने, रस्त्याच्या कडेला उपलब्ध जागेत वृक्षलागवड केली जाईल.
धम्मरत्न मित्र मंडळ, सातवाहन बुद्ध विहार, त्रिरत्न बुद्ध विहार, आम्रपाली बुद्ध विहार, बोधीवृक्ष मेडिटेशन बुद्ध विहार, डिफेन्स करिअर ज्युनिअर कॉलेज आदी संस्था, संघटनांचा सहभाग असणार आहे. उपक्रमासाठी प्रकाश सोनवणे, डॉ. संदीप जाधव, एकनाथ पाखरे, विलास पांडे, प्राचार्य आनंद खरात, सुनील खरात, सुनील हिवराळे, किरण रगडे, विलास भिसे, दीपक पगारे, विनोद कांबळे आदी पुढाकार घेत आहेत.

