पुणे : यंदा कमी पावसाने उपलब्ध पाणीसाठा ऑगस्टअखेरपर्यंत पुरवावा लागणार असल्याने महापालिकेने योग्य नियोजन न केल्यास पुणेकरांना फटका बसेल. पाणीपट्टीची थकबाकी एकरकमी भरल्यास सरकार सकारात्मक निर्णय घेईल. पुणे शहराची वाढती गरज लक्षात घेऊन पाणीकोटा वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.
सविस्तर वृत्त... २
‘एचआर’ला पुण्यात अटक
नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करून तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ अश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुण्यातून अटक केली. दरम्यान, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिक रोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही फरारी आहे.
सविस्तर वृत्त... १०
हेरगिरीचे जाळे उद्ध्वस्त
नवी दिल्ली : पाकिस्तानशी थेट जोडलेले हेरगिरीचे जाळे दिल्ली पोलिसांनी उद्ध्वस्त केले.
सविस्तर वृत्त... फ्रंट पेज २

