‘लालबावटा’ची शहरात निदर्शने

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगरमध्ये लालबावटा रिक्षा चालक युनियनने खासगी एलपीजी गॅस पंपांवर होणाऱ्या लुटीविरोधात निदर्शने केली. रिक्षाचालकांना ६१ रुपये प्रति लिटर दराने एलपीजी गॅस मिळावा अशी मागणी करण्यात आली. वेगवेगळ्या पंपांवर वेगवेगळे दर का आहेत आणि सरकारचे नियंत्रण का नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.

lalbawta rickshaw drivers protest against gas prices in chhatrapati sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर : खासगी एलपीजी गॅस पंपांवर रिक्षाचालकांची होणारी लूट थांबवा, वेगवेगळ्या पंपावर वेगवेगळे दर का, सरकारचे यावर नियंत्रण का नाही असे विविध प्रश्व उपस्थित करीत लालबावटा रिक्षा चालक युनियनच्या वतीने शुक्रवारी (१० एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

रिक्षाचालकांना ६१ रुपये प्रति लिटर दराने एलपीजी गॅस मिळेल याची दक्षता घ्यावी. भरारी पथक काय करते, ते कुठे फरारी असते, अशाही प्रश्नांची सरबत्ती युनियनच्या शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांच्यावर केली. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या निदर्शनात ॲड. अभय टाकसाळ, शेख अमजद शेख पाशू, राजू हिवराळे, वसिम खान सिकंदर खान, शेख एजाज, मोईन गाजी, शेख जुबेर शेख इद्रीस, महंमद रईस, रमेश तोमर, इम्रान पटेल, अमजद खान, मोहसीन शेख, संदीप भालेराव आदी सहभागी झाले होते.