जलधारा, नृत्योत्सवातउद्या विविध कार्यक्रम

महाराष्ट्र टाइम्स

ध्‍यास परफॉर्मिंग आर्टस उद्या तापडिया नाट्य मंदिरात दोन नृत्‍य कार्यक्रम सादर करत आहे. 'जलधारा' हा नृत्‍य कार्यक्रम गुरू अरुंधती पटवर्धन यांच्‍या संकल्पनेतून साकारला आहे. यात केतकी नेवपूरकर, रिद्धी बारपांडे यांसारखे कलाकार सहभागी होतील. यानंतर नृत्योत्सवात विद्यार्थी आपल्‍या कला सादर करतील. हा कार्यक्रम सकाळी दहा ते दुपारी एक आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत आयोजित केला आहे.

jaldhara dance festival special program for dance lovers tomorrow

ध्यास परफॉर्मिंग आर्टसच्या वतीने जलधारा व वार्षिक नृत्योत्सव हे कार्यक्रम रविवारी (१२ एप्रिल) सकाळी दहा ते दुपारी एक व दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत तापडिया नाट्य मंदिरात होणार आहेत. गुरू अरुंधती पटवर्धन यांची संकल्पना व संरचना असलेला जलधारा हा नृत्याचा कार्यक्रम केतकी नेवपूरकर, रिद्धी बारपांडे, अंकिता पाटील, वैष्णवी तोतला, श्रेया कुलकर्णी, विदिशा वेम्बक्कम, प्रिया देशमुख, समीक्षा सुदामे, अनन्या पाटील, समृद्धी कुलकर्णी हे कलावंत सादर करतील. तर, नृत्योत्सवात विद्यार्थ्यांचे सादरीकरण होईल. या वेळी पटवर्धन यांच्यासह मंजिरी कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहील.