छत्रपती संभाजीनगर : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जटवाडा रोड परिसरातील एकतानगर, तक्षशीलानगर, पंचशील चौक, प्रभाग क्रमांक एकच्या वतीने शुक्रवारपासून ते मंगळवार १४ एप्रिलपर्यंत भीमोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज, शनिवारी साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांचा बुद्ध-भीमगीतांचा कार्यक्रम, रविवार १२ एप्रिलला नृत्यस्पर्धा होईल. मंगळवारी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येईल. सायंकाळी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक, माजी नगरसेवक रूपचंद वाघमारे व भीमोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

