‘माझे गाव निरोगी’ उपक्रमाचे उद्घाटन

महाराष्ट्र टाइम्स

निपाणी-भालगाव येथे 'माझे गाव निरोगी' उपक्रमाचे उद्घाटन झाले. शिवा ट्रस्ट, बीएसपी वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाने हा उपक्रम राबवला. जागतिक आरोग्य दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात २६४ रुग्णांची तपासणी झाली. २५ कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लोकांना वेळेवर उपचार मिळतील.

my village healthy initiative takes a step forward in improving rural health

शिवा ट्रस्ट संचलित बीएसपी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने निपाणी-भालगाव येथील ट्रस्टच्या शैक्षणिक संकुलात जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘माझे गाव निरोगी’ या उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन झाले. यानिमित्त मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येऊन शिबिरात एकूण २६४ रुग्णांची तपासणी व बिन टाक्याच्या दुर्बिणीद्वारे २५ कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाही झाल्या.

आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. छाया आवगावकर, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर, शिवा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. नागेश सावरगावकर, डॉ. डोनिमा, डॉ. बी. एन. हिवाळे, डॉ. संजय पाटणे, डॉ. एकनाथ माले, डॉ. मोहन दुबे, शंकरराव आडसूळ, प्रा. सचिन मुंडे, प्रदीप विखे, अनिल झाल्टे उपस्थित होते. कार्यक्रमात मोबाइल मेडिकल व्हॅन व फिरत्या वैद्यकीय पथकाचे लोकार्पण झाले. आमदार चव्हाण म्हणाल्या, ‘प्रत्येक गाव निरोगी व्हावे, ही केवळ योजना नसून आपली जबाबदारी आहे. हा उपक्रम त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल'. ग्रामीण भागातील लोकांना वेळेवर उपचार मिळाले, तर अनेक कुटुंबांचे आयुष्य वाचू शकते, असे गलांडे म्हणाले. मोफत तपासणी, निदान व उपचारांच्या माध्यमातून अनेक गंभीर आजार लवकर ओळखता येतील, असे डॉ. धानोरकर म्हणाले. ‘ही खऱ्या अर्थाने माणुसकीची हाक ठरेल, असे डॉ. पवार यांनी सांगितले.