जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

महाराष्ट्र टाइम्स

राज्यात प्रशासकीय फेरबदल सुरू झाले आहेत. गुरुवारी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या २५ नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. डॉ. किरण पाटील पशुसंवर्धन आयुक्त, दीपक सिंगला मनरेगा आयुक्त तर जी. श्रीकांत जलजीवन मिशनचे संचालक झाले आहेत. सात जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पाच महानगरपालिकांचे आयुक्त आणि चार जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बदलले आहेत. या नियुक्त्या प्रशासकीय कामांना गती देतील.

new appointments of district collectors in the state major reshuffle in administration

राज्याच्या प्रशासनात फेरबदलाची सत्र सुरू आहे. या अंतर्गत गुरुवारी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या २५ नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

डॉ. किरण पाटील हे नवे पशुसंवर्धन आयुक्त (पुणे) म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत, तर दीपक सिंगला यांची नियुक्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नागपूर आयुक्तपदी करण्यात आली आहे. जी. श्रीकांत यांची जलजीवन मिशन, नवी मुंबईचे मिशन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिलीप स्वामी यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, राज्यातील सात जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पाच महानगरपालिकेतील आयुक्त, चार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

गुरुवारी करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये प्राजित नायर यांची पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अंकित यांची नियुक्ती नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयु्क्त म्हणून करण्यात आली आहे. के. मंजुलक्ष्मी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे मध्ये अतिरिक्त आयुक्तपदी तर, वर्षा ठाकूर-घुगे यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबईच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिका आणि आयुक्तांची नियुक्ती पुढीलप्रमाणे :

छत्रपती संभाजीनगर - अमोल येडगे, जालना - अंजली शर्मा, अमरावती - वर्षा लढ्ढा, कोल्हापूर - डॉ. राजेंद्र भारुड, सांगली मिरज कुपवाड शहर - संजीता मोहपात्रा.

जिल्हा परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती पुढीलप्रमाणे :

छत्रपती संभाजीनगर - मिन्नू पी. एम., जालना - कृष्णकांत कनवारिया, अमरावती - सत्यम गांधी, कोल्हापूर - डॉ. जॅसमिन