‘शाळेच्या नाववरून दिशाभूल नको’

महाराष्ट्र टाइम्स

शाळांच्या नावांमध्ये दिशाभूल करणारे शब्द आता वापरता येणार नाहीत. राज्य शासनाने यावर बंदी घातली आहे. केवळ आंतरराष्ट्रीय मंडळांशी संलग्न शाळांनाच असे शब्द वापरण्याची परवानगी असेल. हा निर्णय नवीन शाळांना लागू होईल. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी.

prohibition on using international global in school names

शाळेच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो यांसारखे शब्द वापरून पालक आणि विद्यार्थ्यांची केली जाणारी दिशाभूल आता थांबणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य मंडळ, केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा (सीबीएसई) किंवा आंतरदेशीय मंडळांशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांना त्यांच्या शाळेच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो आदी शब्द वापरण्यास मनाई केली आहे.

आय. बी. केम्ब्रिज, आय. जी. सी. एस. अशा आंतरराष्ट्रीय मंडळांशी संलग्न असलेल्या किंवा या मंडळांशी संलग्न होण्यास इच्छुक असलेल्या शाळांनाच केवळ या शब्दांचा वापर करता येईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे. विभागाने गुरुवारी या संदर्भातील शासन निर्णय प्रसृत केला; परंतु, हा निर्णय पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणार नाही. यापुढे नव्याने स्थापन होणाऱ्या शाळांनाच हा निर्णय लागू राहील.