हितेश मलच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर स्मॅशर योद्धाज संघाने पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मोल्डर्स संघावर सहा विकेटनी मात केली.
नेहरू स्टेडियमवर शनिवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश सोमानी यांच्या हस्ते झाले. या वेळी युवा अध्यक्ष रोनक झंवर, युवा सचिव मनीष मणियार, क्रीडा अध्यक्ष नीरज धूत, क्रीडा सचिव गितेश झंवर उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक : मोल्डर्स - १२ षटकांत ४ बाद ९७ (सुमीत मुंद्रा नाबाद ४३, अभिषेक झंवर २०, प्रथमेश झवर १२, आयुष राठी २-०-२०-२, वरुण भुतडा १-०-९-१, अभय जाजू २-०-२१-१) पराभूत वि. स्मॅशर योद्धाज - ११.३ षटकांत ४ बाद ९८ (हितेश माल नाबाद ५१, किरण चंडक नाबाद १४, प्रथमेश झवर ३-०-२१-३, अमित बिहानी ३-०-२३-१).सारडा स्टॅलियन - १२ षटकांत ४ बाद ९३ (रोहित राठी ३३, गितेश झवर नाबाद १८, यश लढ्ढा १३, श्रीराम चंडक २-०-८-२) वि. वि. हाय-बाईट चॅलेंजर्स - १२ षटकांत ८ बाद ८३ (सर्वेश भट्टड ४६, श्रीराम चांडक १२, हृषीकेश झंवर १०, सागर कारवा २-०-९-३, मधुसुदन कलंत्री ३-०-१७-२, अमित राठी ३-०-१८-२).





