Suspicious Death Of Youth Found In Rajeshwarnagar Area
झुडपात युवकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागपूरच्या मानकापूर हद्दीतील राजेश्वरनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली. मैदानातील झुडपात एका ३० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नागपूर : मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजेश्वरनगर परिसरात मैदानातील झुडपात ३० वर्षीय युवकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृताची ओळख पटलेली नाही. मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.