झील देसाईची माघार;भारताचे ‘पॅकअप’

महाराष्ट्र टाइम्स

छत्रपती संभाजीनगर येथील महिलांच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताची झील देसाई उपांत्य फेरीत खेळली नाही. तिच्या माघारीमुळे स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. दुसऱ्या उपांत्य लढतीत टिया कोवासेविकने एलिना नेपलीला हरवले. झिबेक कुलंबायेवाने महिला दुहेरीचे विजेतेपदही पटकावले. विजेत्यांना करंडक, डॉलर आणि गुण मिळाले.

zheel desai withdraws from tournament indias womens tennis team packs up

भारताच्या झील देसाईने महिलांच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूला पुढे चाल दिली आणि यासह या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.

छत्रपती संभाजीनगर येथे ही स्पर्धा सुरू आहे. दुसऱ्या मानांकित झीलची उपांत्य लढत चौथ्या मानांकित एलिना नेपलीविरुद्ध होती. मात्र, झील कोर्टवर आलीच नाही. तिचे खेळण्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. यानंतर दुसऱ्या उपांत्य लढतीत बोस्निया-हर्झेगोविनाच्या १६ वर्षीय टिया कोवासेविकने अग्रमानांकित कझाकस्तानच्या झिबेक कुलंबायेवाला ७-५, ६-७ (३), ७-६ (४) असा पराभवाचा धक्का दिला. ही लढत तीन तास आणि २२ मिनिटे चालली. अर्थात, झिबेकने एकतेरिना याशिनाच्या साथीने महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावला. झिबेक-एकतेरिना जोडीने एनास्तासिया कुपारेव (जर्मनी) - सेव्हिल युलदाशेवा (उझबेकिस्तान) जोडीवर ६-१, ६-४ अशी मात करून विजेतेपद पटकावले. विजेत्या जोडीला करंडक, ९५० डॉलर व १५ गुण, उपविजेत्या जोडीला करंडक, ५५० डॉलर व आठ गुण देण्यात आले.