कोची : ‘केरळम् जैक्क्यम, यूडीएफ नैक्क्यम’ (केरळ जिंकणार, यूडीएफ नेतृत्व करणार) असे म्हणत काँग्रेसप्रणित यूडीएफने यंदा राज्य जिंकण्याची घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यूडीएला मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेमध्ये पुन्हा हे चित्र दिसण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. कोचीमधील १४ जागांवर काँग्रेसप्रणित यूडीएफने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसले.
गूड फ्रायडेनंतर कोचीसह केरळमधील विविध शहरांमध्ये ईस्टरची लगबग सुरू झाली. फोर्ट कोचीच्या जुन्या परिसरामध्ये ईस्टरच्या निमित्ताने हॉटेले, कॅफेमध्ये वेगळे वातावरण जाणवू लागले होते. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कोचीतील सभेची तयारीही सुरू होती. काँग्रेस नेते व्यवस्था पाहत होते. तर कार्यकर्ते प्रचाराच्या तयारीत गुंतले होते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता आणि राहुल (पान ५वर)

