मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) कॅम्पबेल विल्सन यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी एक समिती स्थापन केल्याचे एअर इंडियाने मंगळवारी सांगितले. मूळचे न्यूझीलंडचे रहिवासी आणि सिंगापूर एअरलाइन्सचे अनुभवी अधिकारी असलेले विल्सन गेल्या चार वर्षांपासून एअर इंडियाचे नेतृत्व करत होते. विल्सन यांनी पद सोडण्याचा आपला मानस २०२४मध्येच एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्याकडे व्यक्त केला होता. एअर इंडियाच्या बोर्डाने एक समिती स्थापन केली असून ती येत्या काही महिन्यांत उत्तराधिकाऱ्याचा शोध घेणार आहे.







