तेहरान : अमेरिकेकडून इराणशी संबंधित जहाजे जप्त करण्याची कारवाई सुरूच राहिली, तर अभूतपूर्व लष्करी प्रत्युत्तर देण्याचा इशारा इराणने बुधवारी दिला. अमेरिकेची नौदल नाकेबंदी आणि जहाज जप्ती हा चाचेगिरीचा प्रकार आहे. त्यामुळे ही कारवाई न थांबल्यास कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे इराणने म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकी लष्कराने इराणी बंदरांची नाकेबंदी कायम ठेवून मंगळवारी आणखी एका व्यापारी जहाजाची झडती घेतली. हे जहाज इराणी बंदराकडे जात नसल्याची खातरजमा केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.
जयशंकर-अराघची
यांच्यात चर्चा
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री सैद अब्बास अराघची यांनी बुधवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा झाली आणि संपर्कात राहण्याचे ठरले. दिल्लीतील इराणच्या दूतावासाने सांगितले, की या चर्चेत युद्धविरामाची स्थिती, द्विपक्षीय संबंध; तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विचारविनिमय झाला.
संबंधित वृत्त...८
दोन ज्यू धर्मीयांवर
लंडनमध्ये चाकूहल्ला
लंडन : लंडन शहराच्या वायव्य भागात हल्लेखोराने चाकूने दोन ज्यूधर्मीय व्यक्तींना भोसकल्याची घटना समोर आली आहे. या ४५ वर्षीय हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले असून, दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. ब्रिटिश पंतप्रधान कियर स्टार्मर यांनी या हल्ल्याचा निषेध केला.
उपवर्गीकरणाचा
फटका बसणार?
मुंबई : अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या अहवालानुसार, महार समाजाला प्रगत ठरविण्यात आले आहे. त्यामुळे उपवर्गीकरणाचा फटका महार समाजाला बसण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, मांग-मातंग हा समाज अजूनही मागासच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त...५
शरद कळसकरला
जामीन मंजूर
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याच्या प्रकरणात दोषी ठरून जन्मठेपेची शिक्षा झालेला शरद कळसकर याची शिक्षा स्थगित करून मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी त्याला सशर्त जामीन मंजूर केला.
सविस्तर वृत्त...५







