अव्यान, आदित्य उपांत्य फेरीत

महाराष्ट्र टाइम्स

अरुण वाकणकर स्मृती गोल्ड सिरीज पीएमडीटीए मानांकन टेनिस स्पर्धेत अव्यान घुमरेने उपांत्य फेरी गाठली. मुलांच्या एकेरीत पलाश रुचंदानी, आदित्य उपाध्ये, अर्जुन बेंद्रे यांनीही विजय मिळवले. मुलींच्या एकेरीत आराध्या पवार, त्रिशा राजपूत, रितिशा नेहे, अंशिका मोगल यांनी आगेकूच केली. एस. पी. कॉलेजच्या टेनिस कोर्टवर ही १२ वर्षांखालील गटाची स्पर्धा झाली.

अव्यान, आदित्य उपांत्य फेरीत
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

अव्यान घुमरे याने अरुण वाकणकर स्मृती गोल्ड सिरीज पीएमडीटीए मानांकन टेनिस स्पर्धेत सनसनाटी विजय नोंदवून उपांत्य फेरी गाठली, तर मुलींच्या एकेरीतून त्रिशा राजपूत, रितिशा नेहे, अंशिका मोगल, आराध्या पवार यांनीही आगेकूच केली.

एस. पी. कॉलेजच्या टेनिस कोर्टवर ही १२ वर्षांखालील गटाची स्पर्धा झाली. मुलांच्या एकेरीत बिगरमानांकित अव्यान घुमरने पाचव्या मानांकित अभिमन्यू चव्हाणला ६-३, ६-३ असा धक्का दिला.

मुलांच्या एकेरीत अव्वल मानांकित पलाश रुचंदानीने नवव्या मानांकित सयान कुवडचा ६-३, ६-१ असा पराभव केला, तर द्वितीय मानांकित आदित्य उपाध्येने आर्जव लुहाडियावर ६-१, ६-१ असा विजय नोंदवला. तसेच, सहाव्या मानांकित अर्जुन बेंद्रेने तेराव्या मानांकित रियान पाटीलवर ६-२, ७-६ (६) अशी मात केली.

मुलींच्या एकेरीत द्वितीय मानांकित आराध्या पवारने रिया पाटीलवर ६-१, ६-२ अशी मात केली. याशिवाय त्रिशा राजपूतने समिका टेपनचा ६-१, ६-२ अशी, रितिशा नेहेने तिथी सोनटक्केचा ६-०, ६-३ असा, ततर अंशिका मोगलने वाणी चतुरचा ६-४, ७-६ (३) असा पराभव केला.