रुद्र कोरेचे शतक आणि रिदीत बीडकर, ओजस आळतेकर यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पारसी जिमखाना संघाने युनायटेड स्पोर्ट्स क्लबवर डाव आणि २२ धावांनी विजय नोंदवला. धानोरीत झालेल्या या लढतीत रुद्रने २४४ चेंडूंत वीस चौकार आणि एका षटकारासह १५५ धावांची खेळी केली.
मेधांश जाधवचे नाबाद द्विशतक, कर्णधार रणवीर चव्हाणची अष्टपैलू कामगिरी आणि जय चौधरीच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर विलास क्लबने १६ वर्षांखालील गटाच्या एमसीए निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पुणे जिल्हा क्रिकेट संघटना (पीडीसीए) संघावर डाव आणि १०९ धावांनी विजय नोंदवला.
डिझायर स्पोर्ट्स ग्राउंडवर ही लढथ झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पीडीसीएचा पहिला डाव १३२ धावांत आटोपला. त्यात रणवीर पांगारेने १५० चेंडूंत सहा चौकारांसह ६५ धावांची खेळी केली.
प्रत्युत्तर देताना विलास स्पोर्ट्स क्लबने ३ बाद ३३७ धावांवर डाव घोषित केला. त्यात मेधांश जाधव आणि रणवीर चव्हाण यांनी मोलाचा वाटा उचलला. मेधांश-रणवीर यांनी दुसऱ्या विकेटसाठी २०३ धावांची भागीदारी रचली. मेधांशने २०९ चेंडूंत ३७ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद २१६ धावांची खेळी केली. रणवीरने ११५ चेंडूंत अकरा चौकारांसह ७४ धावांची योगदान दिले.
डावाने पराभव टाळण्यासाठी पीडीसीएला किमान २०५ धावांची आवश्यकता होती. मात्र, जय चौधरी, रणवीर चव्हाण यांच्या अचूक गोलंदाजीसमोर पीडीसीएचा दुसरा डाव ९६ धावांतच आटोपला.
दुसऱ्या सामन्यात आधान प्रसादच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर आर्यन्स संघाने जालना संघावर आठ विकेटनी मात केली.
संक्षिप्त धावफलक : पीडीसीए : पहिला डाव - ६४.२ षटकांत सर्व बाद १३२ (रणवीर पांगारे ६५, अश्वथचंद्र तोरा ३-१२, नीतेश चौधरी २-२१, जय चौधरी २-१४) आणि दुसरा डाव - ३९.२ षटकांत सर्व बाद ९६ (रणवीर पांगारे ३०, जय चौधरी ४-१३, रणवीर चव्हाण ३-२३) पराभूत वि. विलास स्पोर्ट्स क्लब : पहिला डाव - ६५ षटकांत २ बाद ३३७ (मेधांश जाधव नाबाद २१६, रणवीर चव्हाण ७४); युनायटेड स्पोर्ट्स क्लब : पहिला डाव - सर्व बाद १८० (कृष्णा बाहेती ६८, भुजंग धुलगुंडे ४६, रिदीत बीडकर ७-१७, रुद्र कोरे २-५५) आणि दुसरा डाव - सर्व बाद १३५ (आयुष नाबाद ५७, ओजस आळतेकर ५-२५) पराभूत वि. पारसी जिमखाना : पहिला डाव - ८२ षटकांत ९ बाद ३३७ घोषित (रुद्र कोरे नाबाद १५५, सिद्धान्त लाडे ५३, भुजंग ३-२६); दक्षिण विभाग : पहिला डाव - ६३.१ षटकांत सर्व बाद २९७ (पृथ्वीराज कणसे १७०, अर्जुन बागल ३४, श्रेणिक दुधेडिया ५-७३) वि. मध्य विभाग : पहिला डाव - सर्व बाद १०६ (हनुमान कोटकर २४, श्रेणिक २१, अनुज वाल्मीकी ५-३१, निंब्रज निंबाळकर २-३२, अर्णव ससाणे २-५) आणि दुसरा डाव - सर्व बाद ७९ (पृथ्वीराज ननावरे ३०, जीवन वराडे ५-२९, निंबाळकर ३-२९, ससाणे २-१२); जालना : पहिला डाव - ६०.१ षटकांत सर्व बाद ११३ (पृथ्वी पलाणे २७, ओंकार पवार २४, नीरज बोरसे ४-२४, नक्ष गोमारे ३-१३) दुसरा डाव - २९.३ षटकांत सर्व बाद ६० (ओंकार पवार १९, सिद्धान्त बोर्डे १४, आधान प्रसाद ७-२१, नीरज बोरसे २-१४) पराभूत वि. आर्यन्स : पहिला डाव - ४३.१ षटकांत सर्व बाद १३० (समर्थ पाकळे २७, शर्विल जी. १८, पृथ्वी पलाणे ५-४६, अबू साद २-३४, आदित्य सुरडकर २-१०) आणि दुसरा डाव - १८ षटकांत २ बाद ४४ (नक्ष गोमारे २७, पृथ्वी १-१५, अबू साद १-२३).







