चार धावांत ९ फलंदाज टिपल्या; ब्राझीलच्या लॉराचा विक्रम

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ब्राझीलची लॉरा कार्डोसो टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात नऊ विकेट्स घेणारी पहिली खेळाडू ठरली. तिने तीन षटकांत केवळ चार धावा देत हा विक्रम केला. यापूर्वीचा विक्रम भूतानच्या सोनम येशेच्या नावावर होता. लॉराने इंडोनेशियाच्या रोहमालिया हिलाही मागे टाकले. ही कामगिरी बोतस्वाना येथे झाली.

चार धावांत ९ फलंदाज टिपल्या; ब्राझीलच्या लॉराचा विक्रम

दुबई : ब्राझीलची वेगवान गोलंदाज लॉरा कार्डोसो हिने एकाच डावात नऊ विकेट्स टिपत पुरुष/महिला टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी पहिलीच क्रिकेटपटू होण्याचा मान संपादन केला. गाबोरोन येथील बोतस्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २ मैदानावरील बीसीए कालाहारी महिला टी-२० स्पर्धेत कार्डोसो हिनेे लेसोथो संघाविरुद्ध लक्षवेधक गोलंदाजी केली. तिने तीन षटकांत केवळ चार धावा देत नऊ विकेट्स खिशात टाकल्या. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी याआधी कुणालाच जमली नव्हती.

याआधी...

यापूर्वीचा विक्रम भूतानच्या सोनम येशे याच्या नावावर. त्याने २०२५मध्ये म्यानमारविरुद्ध आंतरराष्ट्रीय़ टी-२० सामन्यात केवळ सात धावांत आठ विकेट्स टिपल्या होत्या

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये कार्डोसो हिने इंडोनेशियाच्या रोहमालिया हिला मागे टाकले

रोहमालियाने २०२४ मध्ये मंगोलियाविरुद्ध एकही धावा न देतो सात फलंदाज टिपल्या होत्या.