काँग्रेसमधील मरगळ झटकण्यासाठी पदाधिकारी बदलले जाणार आहेत. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पदाधिकारी निवड केली जाणार असल्याचे ‘संघटन सृजन अभियान’ कार्यक्रमात डॉ. पलक वर्मा यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने निरीक्षकांच्या नेमणुका करत कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत पक्षाच्या पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी दिली आहे. या अभियानातून पदासाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांचे अर्ज आणि माहिती गोळा केली जाणार असून कार्यकर्त्यांकडून प्राप्त माहितीचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे हा सविस्तर अहवाल २१ एप्रिलपर्यंत पाठवला जाणार असल्याचे वर्मा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

