दिव्याचे पदक तीन गुणांनी हुकले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

स्पेनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत टी. दिव्याचे २५ मीटर पिस्तुलमधील पदक तीन गुणांनी हुकले. ती अंतिम फेरीत चौथ्या क्रमांकावर राहिली. महाराष्ट्राचा नेमबाज गजानन खंडागळे दहा मीटर एअर रायफलमध्ये पाचवा आला. दोघांनी पदकाच्या आशा निर्माण केल्या होत्या पण त्यांचे पदक थोडक्यात हुकले.

दिव्याचे पदक तीन गुणांनी हुकले

जिगरबाज टी. दिव्याचे पदक वर्षातील पहिल्या वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेतील पदक तीन गुणांनी हुकले. तिला स्पेनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील २५ मीटर पिस्तुलमधील वैयक्तिक प्रकाराच्या अंतिम फेरीत चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, महाराष्ट्राचा नेमबाज गजानन खंडागळे दहा मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत पाचवा आला.

दिव्या तसेच गजाननने पदकाच्या आशा निर्माण केल्या पण त्यांचे पदक थोडक्यात हुकले. दिव्या २८ गुणांसह चौथी आली. त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावरील नेमबाजाचे गुण ३१ होते. रिधम सांगवान अंतिम फेरीत सातवी आली. पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या गजाननने ६३४.३ गुणांसह प्राथमिक फेरीत दुसरा क्रमांक मिळवला होता. त्यावेळी त्यांच्यात आणि अव्वल क्रमांकात ०.२ गुणाचा फरक होता. गजानन १८७.५ गुणांसह ्ंतिम फेरीत पाचवा आला. त्यावेळी चौथ्या असलेल्या मा सिहानने गजाननपेक्षा ०.१ गुणच जास्त मिळवला होता.