विक्रीच्या दबावापुढे बाजार झुकला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बाजारात मोठी घसरण झाली. इस्रायल आणि लेबेनॉनमधील तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेत होते. यामुळे शेअर बाजारात मोठी विक्री झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या अंकांनी कोसळले. परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढले. जागतिक बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्या. यामुळे बाजारात भीतीचे वातावरण पसरले.

market shocked by sales investors in dilemma

इस्रायल आणि लेबेनॉन यांच्यातील वाढत्या तणावामुळे इराण-अमेरिका युद्धविरामाबाबत अनिश्चितता वाढली आणि त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुरुवारी वित्तीय, बँकिंग आणि आयटी समभागांची मोठ्या प्रमाणावर विक्री केली. परिणामी, सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या प्रमाणावर कोसळले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून सातत्याने निधी काढून घेतला जाणे आणि जागतिक बाजारात ब्रेन्ट क्रूडच्या घसरण होणे या घटनांनी बाजार आणखी भयभीत झालेला दिसला.

बीएसई सेन्सेक्स ९३१.२५ अंकांनी कोसळून ७६,६३१.६५ वर बंद झाला. दिवसभरात एका क्षणी तो १,२१५ अंकांनी कोलमडत ७६,३४७.९०पर्यंत खाली आला होता. एनएसई निफ्टी २२२.२५ अंकांनी घसरून २३,७७५.१० वर बंद झाला.

शेअर बाजारांकडून प्राप्त आकडेवारीनुसार, बुधवारी परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी २,८११.९७ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ४,१६८.१७ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. सेन्सेक्स बुधवारी २,९४६.३२ अंकांनी वधारून ७७,५६२.९० वर, तर निफ्टी ८७३.७० अंकांनी वधारून २३,९९७.३५ वर बंद झाला होता. परंतु, गुरुवारी झालेल्या घसरणीमुळे या आनंदावर विरजण पडले.