वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

महाराष्ट्र टाइम्स

मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अनिल पटेल यांना शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी वैद्यकीय दाखला देण्याकरिता लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या प्रकरणी रुग्णवाहिकेचा चालक महेंद्र हिंदुराव याच्यासह पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या वडिलांच्या शस्त्र परवान्याच्या नूतनीकरणासाठी हा दाखला आवश्यक होता. एसीबीच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

medical officer caught taking bribe by acb

शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी आवश्यक असलेला वैद्यकीय दाखला देण्यासाठी लाच घेणाऱ्या मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी ) ताब्यात घेतले. या प्रकरणी रुग्णवाहिकेच्या चालकासह या अधिकाऱ्यावर मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरबाड तालुक्यात राहणाऱ्या तक्रारदारास त्यांच्या वडिलांच्या शस्त्र परवान्याचे नूतनीकरण करायचे होते. त्यासाठी आवश्यक असलेला वैद्यकीय दाखला देण्यासाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात गेले असता, १०८ रुग्णवाहिकेवरील चालक महेंद्र हिंदुराव याने वैद्यकीय अधिकारी अनिल पटेल यांच्यासाठी लाच मागितली. ही लाच स्वीकारताना पटेल यांना एसीबीने ताब्यात घेतले. या प्रकरणी पटेल यांच्यासह हिंदुराव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.