शाश्वत शांततेची आशा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराण यांच्यात शनिवारी सायंकाळी थेट चर्चा सुरू झाली. १९७९ नंतर प्रथमच हे दोन्ही देश समोरासमोर बोलत आहेत. या चर्चेमुळे प्रदेशात युद्धविराम आणि शांततेच्या आशा वाढल्या आहेत. अमेरिकेचे शिष्टमंडळ जे. डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखाली तर इराणचे शिष्टमंडळ मोहम्मद बाघेर गालिबफ यांच्या नेतृत्वाखाली आले आहे. दोन्ही देशांचे प्रतिनिधी इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत.

शाश्वत शांततेची आशा

अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या युद्धविरामावर अनिश्चिततेचे ढग असतानाच पाकिस्तानच्या मध्यस्थीने या दोन देशांच्या प्रतिनिधींमध्ये शनिवारी सायंकाळी अधिकृतपणे थेट चर्चा सुरू झाली. पाकच्या सरकारी माध्यमांनी आणि एका सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. तत्पूर्वी, पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराण यांच्या शिष्टमंडळाशी स्वतंत्र चर्चा केली.

सन १९७९मधील इस्लामी क्रांतीनंतर अमेरिका आणि इराणमध्ये प्रथमच समोरासमोर चर्चा होत आहे. उच्चस्तरीय शिष्टमंडळांचे आगमन, पाकिस्तानची प्रभावी मुत्सद्देगिरी आणि जागतिक नेत्यांच्या सकारात्मक विधानांमुळे या प्रदेशात युद्धविराम आणि शाश्वत शांततेच्या आशा बळावल्या आहेत, तर या महत्त्वपूर्ण वाटाघाटींकडे संपूर्ण जग बारकाईने लक्ष ठेवून आहे, असेही त्यांनी सांगितले, असे पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. दोन्ही देशांमधील थेट चर्चेच्या पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर परराष्ट्र कार्यालय निवेदन जारी करण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स करत आहेत. शिष्टमंडळात विशेष दूत स्टिव्ह विटकॉफ, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचा समावेश आहे. इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबफ यांनी केले. यामध्ये परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची, संरक्षण सचिव अली अकबर अहमदीयन आणि केंद्रीय बँकेचे गव्हर्नर अब्डोलनासेर हेम्माती यांचा समावेश आहे.

‘अमेरिकेच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे, जर इराण सद्भावनेने वाटाघाटी करण्यास तयार असेल, तर आम्ही निश्चितच सहयोगाचा हात पुढे करू. जर त्यांनी आमच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न केला, तर वाटाघाटी करणारे शिष्टमंडळ तितकेही सहनशील नसल्याचे त्यांना दिसेल,’ असा इशारा व्हान्स इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वी दिला होता.

सुरुंगांचा अडथळा...८

‘दोन्ही पक्षांमध्ये परस्परसहमती झालेल्या दोन उपाययोजना अद्याप अमलात आलेल्या नाहीत. लेबनॉनमध्ये युद्धविराम, वाटाघाटी सुरू होण्यापूर्वी इराणच्या गोठवलेल्या मालमत्ता खुल्या करणे यांचा यामध्ये समावेश आहे,’ असे गालिबफ यांनी पाकला रवाना होण्यापूर्वी समाजमाध्यमांना सांगितले. ‘वाटाघाटी होण्यापूर्वी या दोन बाबी पूर्ण झाल्या पाहिजेत,’ यावर त्यांनी भर दिला. इस्लामाबादमध्ये दाखल झाल्यानंतर गालिबफ यांनी अमेरिकेवरील विश्वासाच्या मुद्द्यावर भाष्य केले.

‘दोन्ही पक्षांमध्ये परस्परसहमती झालेल्या दोन उपाययोजना अद्याप अमलात आलेल्या नाहीत. लेबनॉनमध्ये युद्धविराम, वाटाघाटी सुरू होण्यापूर्वी इराणच्या गोठवलेल्या मालमत्ता खुल्या करणे यांचा यामध्ये समावेश आहे,’ असे गालिबफ यांनी पाकला रवाना होण्यापूर्वी समाजमाध्यमांना सांगितले. ‘वाटाघाटी होण्यापूर्वी या दोन बाबी पूर्ण झाल्या पाहिजेत,’ यावर त्यांनी भर दिला. इस्लामाबादमध्ये दाखल झाल्यानंतर गालिबफ यांनी अमेरिकेवरील विश्वासाच्या मुद्द्यावर भाष्य केले.