‘होर्मुझचे अडथळेदूर करण्यास सुरुवात’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सैन्याचा विध्वंस झाल्याचा दावा केला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळे दूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत होईल. जग अमेरिकेकडे आशेने पाहत आहे. अमेरिकेतून तेलवाहू जहाजे तेलाने भरून जातील. आखातातील देशांना अमेरिका चांगला पर्याय ठरू शकते.

usa starts removing obstacles in the hormuz strait

वॉशिंग्टन : इराणच्या सैन्याचा विध्वंस झाला असून, आता होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळे दूर करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी केला. मात्र, होर्मुझमधील सुरुंग हटविण्याकडे ट्रम्प यांचा रोख होता की सामुद्रधुनीच्या व्यापक नियंत्रणाला उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केले, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशलच्या पोस्टवर नमूद केले, की, ‘होर्मुझची कोंडी झाल्याने अनेक देशांना तेलाचा तसेच नैसर्गिक वायूचा पुरवठा होऊ शकलेला नाही. या संकटकाळात जग तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी अमेरिकेकडे आशेने पाहत आहे. अनेक रिकामी तेलवाहू जहाजे अमेरिकेच्या दिशेने निघाली असून, अमेरिकेतून ती तेलाने भरभरून जातील. तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा करणाऱ्या आखातातील देशांना अमेरिका हा जगाला चांगला पर्याय ठरू शकतो.’