मागील काही दिवसांपासून राज्यात उष्णतेचा कडाका प्रचंड वाढला आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर तापमानाचा पारा ४० अंशांपलीकडे गेला आहे. उष्णतेच्या या तडाख्यापासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी राज्य सरकारने तीन व्यापक मानक कार्यपद्धती (एसओपी) जारी केल्या आहेत. विशेषतः असंघटित कामगार, खाण कामगार आणि कमी उत्पन्न गटांतील नागरिकांचा यामध्ये प्राधान्याने विचार करण्यात आला आहे.
पहिल्या ‘एसओपी’मध्ये रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलिस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी कामगार, रिक्षाचालक आदी बाहेर काम करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाच्या यलो, ऑरेंज आणि रेड ॲलर्टनुसार कामाचे वेळापत्रक बदलणे, पाणी पिण्यासाठी विश्रांती, पाण्याची व्यवस्था, ओआरएस वितरण, सावलीची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा मजबूत करणे, यांसारख्या उपाययोजनांचा यात समावेश करण्यात आला आहे.
दुसरी ‘एसओपी’ चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी असून, यात उष्णतेच्या ताण व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करण्यात (पान १०वर)








