मध्य भागात वाहतुकीत बदल

महाराष्ट्र टाइम्स

अक्षय्य तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. रविवारी पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त दुचाकी फेरीही निघणार आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक बदल केले जातील. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक शाखेने केले आहे.

significant changes in traffic in pune increased crowds on akshaya tritiya

अक्षय्य तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत आज, रविवारी बदल करण्यात येणार आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

‘अक्षय्य तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. रविवारी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले आहे; तसेच भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त मध्यभागातून दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन रविवारी सकाळपासून मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा,’ असे आवाहन पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.