महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेने फेटाळल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) दोन टक्के वाढीस मंजुरी दिली. त्यामुळे १ जानेवारीपासून डीएचा दर ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त महागाई भत्ता (डीएए) आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई सवलत (डीआर) देण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयाचा लाभ ५०.४६ लाख कर्मचारी आणि ६८.२७ लाख निवृत्तीवेतनधारकांना होईल. यामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी अंदाजे ६,७९१.२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. सामान्यत: मार्चपर्यंत याबाबत घोषणा केली जाते. यंदा एप्रिलचे दोन आठवडे उलटूनही याची घोषणा झाली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.








