शालेय पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप

महाराष्ट्र टाइम्स

महापालिका स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. औरंगपुरा येथे ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत मकरिये यांची पुस्तकतुला करण्यात आली. या पुस्तकांचे आणि वह्यांचे वाटप महापालिकेच्या विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.

distribution of school books on birthday initiative by anil makriye

महापालिका स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्या वाढदिवसानिमित्ताने (१६ एप्रिल) विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थायी समितीचे सभापती मकरिये यांची औरंगपुरा येथे पुस्तकतुला करण्यात आली. ही पुस्तके, वाह्याचे वाटप महापालिकेच्या विद्यार्थ्यांना केले जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. या प्रसंगी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, श्रीधर बक्षी, अजितसिंह चौहान, भूषण मुधलवाडकर, नितीश जोशी, जयेश चव्हाण, कचरू घोडके, धनंजय कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.