छत्रपती संभाजीनगर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) दिव्यांग आघाडी, मातोश्री कौशल्या देवी सेवाभावी संस्था यांच्या वतीने आज, रविवारी दिव्यांग बांधवांसाठी मोफत आधार नोंदणी व आधार अपडेट; तसेच जीवनावश्यक साहित्याचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दुपारी ३ वाजता कार्यक्रमास सुरू होईल. पालकमंत्री संजय शिरसाट, अपारंपरिक उर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, महापौर समीर राजूरकर, पप्पू कागदे, बाबूराव कदम, डॉ. सिद्धार्थ भालेराव, मिलिंद शेळके, विजय मगरे, विष्णू वैरागड, तुकाराम शिरसाट यांची उपस्थिती आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश माने, लक्ष्मण माने, बाळासाहेब पोकळे, मुंजा खंदारे, समाधान दाभाडे आदींनी केले आहे.





