सफारी पार्क दिवाळीपर्यंत खुले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगर येथील मिटमिटा सफारी पार्क दिवाळीपर्यंत पर्यटकांसाठी खुले होणार आहे. पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्त परिसराची काळजी घेण्यास सांगितले आहे. सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाचे स्थलांतर सप्टेंबरमध्ये करण्याची सूचना देण्यात आली आहे. कामाबद्दल पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

safari park to remain open until diwali ensuring environment and cleanliness is essential

छत्रपती संभाजीनगर : मिटमिटा येथील सफारी पार्क दिवाळी पर्यंत नागरिकांसाठी खुले करण्याचे संकेत शुक्रवारी देण्यात आले. दिवाळीपर्यंत हे पार्क खुले करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, वृक्षारोपण करावे अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

सफारी पार्कच्या कामाची पाहणी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, अनिल मकरिये, अब्दुल समीर, गणेश लोखंडे, आयुक्त अमोल येडगे यांनी केली. सफारी पार्कच्या कामाचे सल्लागार ब्रिजेश शर्मा यांनी सादरीकरण केले. सफारी पार्कमधील सोयीसुविधांची माहिती त्यांनी दिली. कामाबद्दल पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दिवाळीपर्यंत हे पार्क सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांनी दिले. पार्कचा परिसर प्लास्टिकमुक्त असला पाहिजे याची काळजी घ्या, असे आदेश आयुक्तांनी दिले. सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाचे स्थलांतर सफारी पार्कच्या जागेत सप्टेंबरमध्ये करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना करण्यात आली.